Header Ads

यवतेश्वर घाटात बिबट्यांचा वावर satara

सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस डोंगरराळ आणि दुर्गम भाग असल्याने या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असतो. गेले काही दिवस यवतेश्वर घाटात दोन बिबट्यांचा मुक्तपणे वावर सुरु आहे. यवतेश्वर येथील निवांत हॉटेलमधून नुकताच टिपलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच कास परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले होते. कास पुष्प पठार व कास तलाव परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ सुरू असल्याने अनेकजणांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. वारंवार बिबटे, रानगवे व इतर जंगली प्राण्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments