Header Ads

फुल्ल टू धमाल करणारा "स्वीटी सातारकर" चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला satara

सातारा : 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय..... असे खटकेबाज संवाद असलेली आगळीवेगळी प्रेमकहाणी आता प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. स्वीटी सातारकर या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लोंच करण्यात आला असून, अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांना फ्रेश कलाकार आणि दमदार गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं असून ध्रुव दास, सतीश जांबे, रिया तेंडुलकर, सुधाकर ओमळे आणि स्वरूप स्टुडिओझ हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सुमित गिरी यांनी चित्रपटाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेला हा चित्रपट निश्चितपणे प्रेक्षकांची दाद मिळवणार असल्याच ट्रेलर वरून स्पष्ट झाल आहे. खटकेबाज संवाद हे तर चित्रपटाच विशेष वैशिठ्यच ठरणार आहे. त्यामुळे ज्या तरुणावर स्वीटी सातारकर जीव ओवाळून टाकते तिला तो मिळणार का ? याच उत्तर चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहे. फुल्ल टू धमाल करणारा "स्वीटी सातारकर" चित्रपट २८ फेब्रुवारीला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, आपण सर्वांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन कलाकार अमृता देशमुख व संग्राम समेळ यांनी प्रेक्षकांना केले आहे. 

No comments