Header Ads

सातारच्या एनआरसी विरोधी आंदोलनात मुस्लिमेतरांचा वाढता सहभाग satara

सातारा : एनआरसी, एनपीआर, सीएए विरोधी कृती समिती, सातारच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असुन, आज दिवस ८ व्या  दिवशीही आंदोलन सुरूच होते. आज नवीदिल्ली येथुन हुतात्मा दिनाच्या पासुन समाजवादी समागमच्या वतीने समाजवादी विचार यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्या यात्रेतील सहभागी कार्यकर्ते यांनी आंदोलन स्थळी भेट देवून पाठिंबा जाहीर केला. एनआरसी, सीएए, एनपीआर, बेरोजगारी, आर्थिक मंदी यासंदर्भात जनजागृती करत ही यात्रा आज सातारा येथे आली. धरणे आंदोलनाला या कार्यकर्त्यांनी  पाठिंबा दिला. यामध्ये मध्यप्रदेशचे डॉ.सुनिलम, आराधना, हिमाचल प्रदेशचा रोहन, उत्तराखंडच्या प्रमिला, स्वाती, अंजना, लोकेश, अरुण श्रीवास्तव, बीडचा गणेश, विजय, छतयुसुफ, बालाभाई, नवनाथ लोंढे सहभागी झाले होते.

डॉ. सुनिलम यांनी देशभर चाललेल्या एनआरसी विरोधी आंदोलनाची माहिती यावेळी बोलताना दिली. आणी लढकर जितेंगे असा विश्वास आंदोलनकर्त्यांना दिला. यावेळी डॉ.हमिद दाभोलकर, विजय मांडके, मिनाज सय्यद, हाजी मुफ्ती, जमीर शेख, कमरुद्दिन, जयंत उथळे, राजेंद्र गलांडे, मिलिंद पवार व मुक्ती वादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागील चार दिवसांपासून मुस्लिमेतरांचा सहभाग चांगलाच वाढतोय. आज मोठ्या प्रमाणात दलित बांधव सहभागी झालेले दिसले. आंदोलनस्थळी आज तरुण तरुणींनी आपल्या चेहरयावर एनआरसी, एनपीआर, सीएएला विरोध असे लिहिलेले होते. अनेकजण चेहरे रंगवून घेत होते. 

No comments