Header Ads

बोंडारवाडी धरणासाठी धरण कृती समितीचे चक्काजाम करणार satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरणासाठी सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. धरण झालेच पाहिजे, या मागणीसाठी बोंडारवाडी धरण कृती समिती व सर्व पक्षीय कार्यकर्ते, युवक, ज्येष्ठ नागरीकांसह मुंबईकर रहिवाशी यांच्या वतीने रॅली निघणार आहे. ५४ गावांतून मोटर सायकल रॅली काढून उद्या सोमवार १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनासाठी जनजागृती करण्यात आली. हे चक्काजाम आंदोलन सातारा महाबळेश्वर या रोडवरती होणार आहे. बोंडारवाडी धरण होणे काळाची गरज आहे. आज भुतेघर, डांगरेघर मार्गे केळघर, वाघदरे, कुसुंबी, मेढा ते मोरावळे पर्यंतच्या ५४ गावातील युवकांसह प्रत्येक गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दमदमून गेला.

No comments