Header Ads

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीकडे करणार कूच? satara

सातारा : महाराष्ट्रामध्ये यशाच्या दरवाज्यातून परतलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये एका मोठ्या संभाव्य बदलाची चाहूल लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये एक मोठी जबाबदारी घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस येत्या २४ फेब्रुवारीला आहे. या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपकडून त्यांना राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रीपद देण्याची घोषणा होणार असल्याची चर्चा साताऱ्यात मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीकडे कूच नेमकी कधी करणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments