Header Ads

शिवेंद्रराजेंची प्रकृती ठणठणीत असल्याची उदयनराजेंकडून ट्विटर वरून माहिती satara

सातारा : मंगळवारची रात्र सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर शिवेंद्रराजेंच्या प्रकृतीचा धोका टळला. संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी ते स्वत: बुधवारी सकाळी मुंबईला गेले.दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः ट्विट करत शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे.

काय आहे उदयनराजेंचे ट्विट

आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत आहे. कार्यकर्ते व समर्थक यांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे सांगत हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज घेऊन ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन संवाद साधतील. अशी ग्वाही देखील उदयनराजेंनी ट्विटमधून दिली आहे. #GetWellSoon असा टॅगही उदयनराजेंनी पोस्टमध्ये दिला आहे. 

No comments