Header Ads

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर व जिल्ह्यात ठिकठिकाणी 'वंचित'चे निदर्शने-आंदोलन satara

सातारा : केंद्रातील सरकारच्या चूकीच्या धोरणामूळे आज देशासमोर अर्थव्येवस्थेचे गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनावर वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन जिल्हाप्रमुख चंद्रकांत खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिवाय जिल्ह्यातही फलटण, कराड, वाई आदी ठिकाणीही निदर्शनासह आंदोलन छेडण्यात आले.

केंद्र सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर सारखे संविधान विरोधी कायदे करून अराजकता माजवण्याचे काम करत आहे. अशावेळी देशातील केरळ, पंजाबसहीत अनेक राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष अधीवेशन बोलवून सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात ठराव केले आहेत. परंतू महाराष्ट्रातील सरकारने अद्याप असा कोणताही ठराव केला नाही. एनआरसीचे पहीले पाउल म्हनून केंद्र सरकारने १ मेपासून एनपीआर'ची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यसरकारने सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात तात्काळ ठराव पारीत न केल्यास महाराष्ट्रातील ४० टक्के एस सी/एस टी/ओबीसी'सहीत मुस्लीम व अल्पसंख्यांक धोक्यात येणार आसल्याने एनपीआरची अंमलबजावनी रोखावयाची असेल तर विधानसभेमध्ये बहुमताने एनपीआर, एनआरसी विराधी ठराव करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील पुरागामी विचाराच्या महाआघाडी सरकारने एनपीआर, एनआरसीची राज्यात अंमलबजावनी करणार नाही. असा ठराव विधानसभेत मांडून बहूमताने सहमत करून घ्यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभर कांग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार यांच्या विधानसभा क्षेत्रातील कार्यालय किंवा निवासस्थान तसेच जिल्हाध्यक्ष कार्यालयावर आंदोलने आयोजीत करण्यात आली होती. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, जावली येथील कार्यकर्ते सातारा याठिकाणी उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयावर तसेच कराड- उत्तर, कराड-दक्षिण, पाटण येथील कार्यकर्त्यानी आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, खा.श्रीनीवास पाटील यांच्या कार्यालयावर/ निवासस्थानावर तसेच खटाव, माण, फलटण येथील कार्यकर्त्यानी  आ.दिपक चव्हाण, विधान परिषदेचे अध्यक्ष ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कार्यालयावर/निवासस्थानी एनपीआर, एनआरसीच्या विरोधात सभाग्रहात ठराव करण्यात यावा. या मागणीकरीता विनंती निदर्शने आंदोलन करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन कार्यालयात देण्यात आली. आंदोलनास जिल्ह्यातील एससी/ एसटी/ भटके विमुक्त/ आदीवासी/ मुस्लीम/ अल्पसंख्यांक समुदायाच्या वेगवेगळ्या संघटना व वंचित बहुजन आघाडीचे सर्व समन्वयक तसेच भरीप बहुजन महासंघाच्या सर्व विंग याचे जिल्हा तालुका शहर व शाखा  यांचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी मोठंया संख्येने उपस्थित होते.

No comments