Header Ads

सातारा सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू satara

सातारा : सदरबझार येथील सैनिक स्कूलमधील कुणाल कृष्णा वाणी वय -७, सध्या रा.सैनिक स्‍कूल, सातारा मूळ रा. मूळ रा.नाशिक या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. सातारा सैनिक स्कूलमध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, कुणाल वाणी हा रविवारी सुट्टी असल्‍याने पोहत होता. यावेळी त्‍याच्यासोबत इतर मित्रही होते. पोहत असताना तो बुडाला. या घटनेमुळे खळबळ उडाली. सैनिक स्‍कूल प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुणाल याचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला. तसेच शहर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. कुणालचा मृतदेह सापडल्‍यानंतर शवविच्छेदनासाठी तो सिव्‍हीलमध्ये आणण्यात आला. दरम्‍यान, या घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

No comments