Header Ads

करोना विषाणूबाबत सआरोग्य विभागाचे जनतेला आवाहन; पालकमंत्र्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना satara

सातारा : करोना विषाणूबाबत सर्वसाधारण माहिती व प्रतिबंधाची खबरदारी घेण्याच्या आरोग्य विभागाकडून  जनतेला आवाहन कारण्यात येत आहे. आज साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील सद्यस्थिती व नियोजन

सातारा जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांची करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन डॉ. ज्ञानेश्वर हिरास व डॉ. सायली सुपेकर हे याबाबत कामकाज पाहत आहेत. जिल्हा परिषदेचे डॉ. सचिन पाटील अति. जिल्हा आरोगय अधिकारी हे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत. जिल्हा रुग्णालय सातारा येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांचे करोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत कार्यशाळा घेण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या.तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे करोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीसाठी माहिती प्रसारीत करण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या सर्व सुचना लेखी स्वरुपात पाठविण्यात आल्याआहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे,इंडियन मेडिकल असोसिएशन सातारा,इंडियन पिडयाट्रीक असोसिएशन सातारा,व जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन सातारा, यांना महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार काम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

जिल्हा रुग्णालय सातारा येथे करोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी 2 स्वतंत्र विलगीकरण कक्ष अत्याधुनिक आवश्यक सुविधेसह स्थापन करण्यात आला आहे. तसेच पी.पी.ई किट्स, ग्लोव्हज, मास्क इ. आवश्यक साहित्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरीकांना परदेशातुन आलेल्या व्यक्तीची माहिती जिल्हा  नोडल ऑफीसर यांना देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.आरोग्य विभागामार्फत या आजारा बाबत जनतेमध्ये जागृती  व्हावी म्हणून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

साध्यासुध्या सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्स सारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटास करोना विषाणू असे म्हणतात. सन २००३ साली आढळलेला (SARS) सार्स हा देखील एक प्रकारचा करोना विषाणूच होता. सध्या चीनमधील उद्रेकात आढळलेला विषाणू हा करोना विषाणूच आहे. तथापि त्याची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्यास नॉव्हेल करोना विषाणू असे नाव देण्यात आले आहे.

करोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे :  सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड), - गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे,  श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा,  न्यूमोनिआ,  पचनसंस्थेची लक्षणे, अतिसार,  काही रुग्णांमध्ये,  मूत्रपिंड निकामी होणे,  प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये असामान्य (Typical) लक्षणे आढळू शकतात.

रोगप्रसार : या विषाणूचा प्रसार नक्की कशाप्रकारे होतो याची निश्चित माहिती आजच्या घडीला उपलब्ध नाही. मात्र लक्षणांचे स्वरुप पाहता, शिंकणे, खोकणे यावाटे हवेमार्फत (Droplet) या विषाणूचा प्रसार होत असावा, असा एक अंदाज आहे. या विषाणूकरीता कोणतीही लस अथवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. करोना विषाणू हा प्राणीजन्य आजार असला तरी हा नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो याबदद्ल सध्या निश्चित माहिती नाही.

उपचार : रुग्णाच्या लक्षणानुसार करावा.  रुग्णाला साह्यभूत ठरणारी निगा (Supportive Care) अत्यंत प्रभावी ठरते

प्रतिबंधाची खबरदारी : या विषाणूचा उद्भव कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो, हे निश्चितपणे माहित नसल्याने या संदर्भात निश्चित प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी, यावर भाष्य करणे कठीण असले तरी सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरुप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे घेणे आवश्यक आहे.  श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे.  हातांची नियमित स्वच्छता.  न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये.  फळे, भाज्या न धुता खाऊ नये.  खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल/टिश्यू पेपरचा वापर करावा  अशा प्रकारे वापरलेले टिश्यूपेपर ताबडतोब व्यवस्थित झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकावेत.

पुढील व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यावा : श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती.  हा त्रास कोणत्या आजारामुळे /विषाणूमुळे होत आहे हे स्पष्ट होत नसल्यास आणि रुग्णाने नुकताच मध्यपूर्वेत प्रवास केला असल्यास. प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन करोना विषाणू बाधित देशात प्रवास केला आहे. रुग्णास उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याकरीता रुग्णास उपचार करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी सुयोग्य संसर्गप्रतिबंध व नियंत्रण पध्दती वापरणे आवश्यक आहे.

No comments