Header Ads

राजमाता जिजाऊ विद्यालयात मा.खा.श्री.छ.उदयनराजेंचा वाढदिवस साजरा satara

सातारा : माजी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज रुग्णालयाचा वर्धापन दिन गोडोली येथील राजमाता जिजाऊ विद्यालयातील विध्यार्थ्यांना पंखा भेट देऊन तसेच रुग्णालयात केक कापून साजरा करण्यात आला. विलास नाना शिंदे मित्र समूहाच्यावतीने उदयनराजेंच्या वाढदिनी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात. यापूर्वी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेपयोगी साहित्याचे वाटप देखील करण्यात आले आहे. उदयनराजेंच्या वाढदिनी दरवर्षी डी.जी.बनकर यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम देखील राबिवले जातात. नगरसेवक डी.जी.बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विलास नाना शिंदे दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवतात. यावेळी डी.जी.बनकर, मनोज शेंडे, विलास नाना शिंदे, विनोद मोरे, पंडितराव मोरे, धनंजय शिंदे, राजीव शिर्के, मिलिंद बारटक्के, गौरव जाधव, रामनाथ वायफळकर, प्रवीण साळुंखे, अमोल पवार शाळेचे मुख्याध्यापक श्री.गवारे, शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments