Header Ads

बंदोबस्तावरील पोलिसांना खुर्च्या द्या; खा.शरद पवारांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे सुचना satara

सातारा : कोणताही राजकीय व अराजकीय कार्यक्रमानिमित्ताने पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्याठिकाणी मोठा ताण पोलिसांवर येतो. यासाठी पोलिसांकरीता बसण्यासाठी आयोजकांनी खुर्च्यांची व्यवस्था करावी, अशी महत्वपूर्ण सुचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली. ते मिरजेतील गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता सभेत बोलत होते. देशातील पथदर्शी प्रकल्पाचा महाराष्ट्र राज्यातून प्रारंभ व्हावा, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना यासंदर्भात दिलेले पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले.

श्री. पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांचे लक्ष बंदोबस्तात तासनतास उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडे गेले. त्यांना उद्देशुन बोलतांना श्री. पवार म्हणाले, कार्यक्रमापेक्षा वेगळ्या विषयावर जाताजाता बोलतो आहे. गेल्या तीन तासांपासून इथला कार्यक्रम सुरू आहे. आम्ही सर्वजण येथे स्थानापन्न आहोत. पोलिस कर्मचारी मात्र, सलग उभे आहेत. त्यांच्या मोठा ताण दिसून येतो आहे. विशेषतः महिला अधिकारी-कर्मचारी यांना अधिक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आयोजकांनी करायला हवी. देशातील पथदर्शी प्रकल्पाची महाराष्ट्र राज्यातून प्रारंभ व्हावा, ही अपेक्षा आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांना पाठवलेले पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यांनी विनंतीपर दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की मंत्री व अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौरा आणि सभेवेळी पोलिसांवर मोठा ताण असतो. दौरा प्रसंगी रस्ता बंदोबस्तासाठीही पोलिस यंत्रणा तासनतास रस्त्याच्या दुतर्फा तिष्ठत उभी राहिलेली दिसून येते. नियोजित वेळेपेक्षा दौऱ्यास विलंब झाला असाता कर्मचाऱ्यांवरील ताण असहणीय होतो.  तसेच पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकारी तिष्ठत उभे राहणे मला उचीत वाटत नाही. त्या आवश्‍यकतेनुरूप बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषय मार्गदर्शक सुचना देण्यात याव्यात. तसेच रस्त्यावरील बंदोबस्त लावताना वायरलेस व इतर संदेश यंत्रणेद्वारे मान्यवर व्यक्तींच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत वेळेचे अचुक नियोजन व्हावे, असेही वाटते.

No comments