Header Ads

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्यासाठी पाचगणी पोलिसांना दिले निवेदन satara

पाचगणी : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी भारतात राहून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करीत त्यांचेवर पांचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना मावळा प्रतिष्ठानचे राज्य कार्याध्यक्ष नितीनभाई भिलारे, बाबाजी उंबरकर, गणेश गोळे, विशाल डांगीस्ते, अवधूत उंबरकर यांनी वारीस पठाण यांचेवर गुन्हा दाखल करण्याविषयी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथिल सभेमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लिम महिला) पुढे आल्या तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो तर काय होईल ? आपण १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी आहोत. लक्ष्यात ठेवा हो गोष्ट अशा खालच्या पातळीचे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. भारतीय नागरिकांना जीवे मारण्याचे धमकी वजा खुले भाषण करून आव्हान दिले आहे. १५ करोड मुसलमान १०० कोटी भारतीयांना भारी पडतील असे वादग्रस्त विधान करून तमाम भारतीय जनतेची मने दुखावली असून, जनतेमध्ये असंतोष निर्माण करून धार्मिक दंगली घडविण्याचा मनसुबा राखणाऱ्या वारीस पठाण या समाजकंटक, देशद्रोही व्यक्तिविरुद्ध आपण त्वरित गुन्हा दाखल जारून त्यास तातडीने अटक करून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. हा देश सर्वधर्म संमभावाने गुण्यागोविंदाने नांदत असताना त्यांच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय व धार्मिक पोळी भाजून घेणाऱ्या कुप्रवृत्तीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शेवटी केली आहे.

No comments