Header Ads

शासनाच्या निषेधार्थ भाजपची साताऱ्यात निदर्शने satara

सातारा : भाजपचे सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे व शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

भाजपचा विश्‍वासघात केलेल्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना २५ हजार रूपये हेक्टरी व फळबांगासाठी ५० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते.  प्रत्यक्षात ८ हजार रूपये हेक्टरीपेक्षा एक रूपयाचीही अधिक मदत करण्यात आलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशी आश्‍वासने देण्यात आली होती. मात्र हे आश्‍वासनही पाळण्यात आले नाही असा दावा करत राज्य शासनाच्या निषेधार्थ ही निदर्शने करत भाजप कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी भाजपच्या विविध मान्यवर व महिला पदाधिकारी यांची भाषणे झाली. 

No comments