Header Ads

एनआरसी विरोधात संघर्ष तिव्र करणार : डॉ.भारत पाटणकर satara

सातारा : एनआरसी विरोधी आंदोलनात मुस्लिमेतरांचा सहभाग वाढविण्यासाठी आमच्यासारखे नक्कीच प्रयत्न करतील. कारण संघर्षातून मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आता संघर्षाची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी केले आहे. एनआरसी, एनपीआर, सीएए विरोधी कृती समितीच्या साताराच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम भगिनींनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आजच्या अकराव्या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते. आज डॉ.भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी येवून पाठिंबा दिला. त्यावेळी डॉ.भारत पाटणकर बोलत होते. यावेळी मिनाज सय्यद, सुभाष जाजू, हाजी मुफ्ती, विज्ञान मांडके, डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ.हमीद दाभोळकर, राजेंद्र गलांडे, चैतन्य दळवी उपस्थित होते. यावेळी हिंदू-मुस्लिम सलोख्याची अनेक उदाहरणे डॉ.भारत पाटणकर यांनी दिली.

दरम्यान,  देशातील धार्मिक, जातीय विद्वेषाने प्रेरित जमावी हिंसेचा प्रतिरोध करण्यासाठी 'प्रेमाची वारी' सुरू झाली होती. त्या वारीने देशातील आठ राज्यात अशा जमावी हिंसेचे बळी ठरलेल्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या. त्यांचे दुःख जाणून घेतले. त्यावर  आधारित प्रेमाची वारीचे अभिवाचन निशा साळगावकर, कृतार्थ शेगावकर, रणजित प्रमोद मुजुमदार (पुणे) यांनी सादर केले. यावेळी मंजू निमकर, वर्षा देशपांडे, सुफियान, मुजफ्फर सय्यद, सफदर सय्यद यांची पाठिंबा दर्षक भाषणे झाली.

No comments