Header Ads

वारीस पठाण यांच्या भडकाऊ विधानाचा सातारा शाहीनबागमध्ये तीव्र निषेध; सोमवारपासून भारत जोडो अभियान satara

सातारा : वारीस पठाण यांच्या भडकाऊ विधानाचा सातारा शाहीनबागमध्ये तीव्र निषेध करण्यात आला आहे. एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधी कृती समिती सातारच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम भगिनींनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाच्या आजच्या दिवशी हा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी कोणालाही विरोध करताना आमची भाषा ही सौजन्यशील आणि विनम्रतेची असेल. तसेच आम्ही आमची निदर्शने आणि विरोध करताना शिवराळ वा असभ्य भाषा वापरणार नाही. असा संकल्प सोडला होता. त्यामुळे वारिस पठाण यांच्या भडकावू विधानाचा निषेध करण्यात आला असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, येत्या सोमवारपासून महिला आणि पुरुषांच्या टीम साताऱ्यातील सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांशी चर्चा करण्याचे भारत जोडो अभियान राबविणार आहेत.

No comments