Header Ads

केंब्रिज पोक्सो अंतर्गत अटकेत संशयितास पाच दिवसाची पोलीस कोठडी satara

पाचगणी : भिलार ता. महाबळेश्वर येथील केंब्रिज हायस्कुलच्या विद्यार्थाना अशिल्ल चित्रफीत दाखवल्या कारणाने व वेळोवेळी मारहाण केल्याप्रकरणी केंब्रिज हायस्कुलच्या ताब्यात घेतलेल्या सुरज भिलारे रा सोमर्डी, ता. जावळी व स्वप्नील कदम रा, कळमगाव ता. महाबेळेश्वर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.

पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार, केंब्रिज हायस्कूलमधील लैंगिक शोषण, चित्रफीत दाखविणे, मारहाण करणे, जेवण वेळेवर न दिल्याप्रकरणी व पिढीत आदिवासी विद्यार्थी पालक तानाजी शांताराम साबळे रा.निमगीरी ता.जुन्रर जि. पुणे या पालकाने सातारा येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर सदर फिर्याद पाचगणी पोलीस ठाणात वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार गतिमान तपास करीत वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस स्टेशनच्या सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केंब्रिज हायस्कूलचे कर्मचारी  स्पनिल कदम व सुरज भिलारे यांना ताब्यात घेऊन अटक करीत महाबळेश्वर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments