Header Ads

दिव्यांगांना मोफत उपकरणांचे वाटप satara

सातारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर तथा एम.एल.ए.हॉस्टेल,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ते 7 मार्च 2020 रोजी एम.एल.ए.हॉस्टेल,नागपूर येथे दिव्यांग उपकरण चीन्हीकरणाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकल,व्हीलचेअर,कैलीपर्स,कृत्रिम जयपूर पाय, कृत्रिम जयपूर हात,कुबड्या,शुज,बेल्ट,कमी ऐकू येणाऱ्यांसाठी कानाचे मशीन या सर्व उपकरणांचा समावेश असणार आहे व ही सर्व उपकरणे लाभार्थीना नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२६९१३९५ किंवा ०२२-२२६९१३९८ या दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा.

No comments