Header Ads

आ.महेश शिंदेंचा हा आभार अन विकास दौरा; कोरेगाव मतदार संघाचे आता सोने होईल : रमेश उबाळे satara

कोरेगाव : आ.महेश शिंदे यांनी  कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी सुरू केलेला हा केवळ आभारदौरा नाही तर विकादौराही असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केले. आ.महेश शिंदे यांचा सध्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आभारदौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून तांदुळवाडी ता. कोरेगाव  मतदारांचे आभार मानण्यासाठी ते आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात रमेश उबाळे बोलत होते. यावेळी कोरेगाव भारतीय जनता पार्टीचे कोरेगाव शहराध्यक्ष राहुल बर्गे, ल्हासुरणें ता.कोरेगावचे माजी उपसरपंच प्रशांत सपकाळ, शिवाजी गुरव, तांदुळवाडीचे मतकर अण्णा उपस्थित होते.

रमेश उबाळे म्हणाले, आ.महेश शिंदेंच्या रूपाने कोरेगाव तालुक्याला विकासाची दृष्टी असणारा लोप्रतिनिधी मिळाला आहे. पूर्वी फक्त विकासकामांचे नारळ फुटत होते. परंतु आता नारळ फुटल्यानंतर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होताना दिसत आहे. खर तर हा आभारदौरा आहे परंतु आभारदौऱ्यात आ.महेश शिंदे विकासकामाचे वाटप करत असून म्हणून हा फक्त आभारदौरा नसून विकासदौरा आहे. यावर्षी राज्यामध्ये मोठी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आ.महेश शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बंधावर जाऊन पिकांची झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी रानामध्ये अक्षरशः चिखल होता याचीही त्यांनी कधीच पर्वा केली नाही. कोरेगाव-सातारा रस्त्यावर एस.टी. थांबत नसल्याचे आम्ही आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने अगार व्यवस्थापकाना बोलावून माझ्या मतदार संघातील एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होता कामा नये असे सुनावले शेतकरी, कार्यकर्ता, सामान्य माणूस आला तरी आ.महेश शिंदे त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. महेश शिंदेनी विधानसभेच्या निवडणूकिमध्ये तांदुळवाडी गावातील महिलांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे येथील महिला बचत गटांना द्रोण, पत्रावळी बनविण्याचे मशीन दिले आहे. लवकरच बचत गटांना तेलाचे घाणे देण्यात येणार आहेत. महिलांना रोजगार देऊन सक्षमीकरण करण्याचा पॅटर्न ल्हासुरणें जिल्हा परिषद गटामध्ये  राबविला जात असून  हा पॅटर्न आता ते विधानसभा मतदारसंघातही राबविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. खरे तर मला आमदारकीचा लोभ कधीच नव्हता. कोरेगाव मतदार संघातील प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे हे माझे ध्येय आहे. अनेक कार्यकर्ते प्रमिणीकपणे माझ्याबरोबर राहिल्याने मला आमदार होण्याची संधी मिळाली असल्याचे आ.महेश शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी रमेश उबाळे म्हणाले, विकासकामे ही नेहमीची आहेत. परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा आमदार मी महेश शिंदेच्या रूपाने प्रथमच अनुभवत आहे. लोकांना कॅन्सर, हृदयविकारासारखे आजार होत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे आपण जे अन्न खात आहोत तेच विष असल्याचे समोर येत असल्याने विषमुक्त शेती, विषमुक्त स्वयंपाक घर ही संकल्प योजना ते आता कोरेगाव मतदार संघात राबविणार आहेत. राजकारणातुन समाजकारण करणारे आ. महेश शिंदे हे खरे जननायक असल्याचेही उबाळे यावेळी म्हणाले.

No comments