Header Ads

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बेल एअर रुगालयास भेट satara

सातारा : पाचगणी येथील बेल एअर रुग्णालयाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन रुग्णालयाकडून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बेल एअर रुग्णालयात रुग्णांना ठेवण्यात येणाऱ्या विविध कक्षांना भेट देवून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती रुग्णांकडून जाणून घेतली. तसेच या रुग्णालयाकडून चालविण्यात येणाऱ्या नर्सिग महाविद्यालयासही भेट देवून विद्यार्थींना देण्यात येणाऱ्या सुविधांचीही माहिती राज्यपाल महोदयांनी जाणून घेतली.

No comments