Header Ads

बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वीत; २५ दुचाकी गाड्यांचा समावेश satara

सातारा : सातारा पोलिस दलात आजपासून बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वीत करण्यात आला. महिलांबाबत घडणारे गुन्हे, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी या आणि इतर प्रकारच्या गुन्ह्यांना यामुळे आळा बसणार आहे. या योजनेत आज २५ दुचाकी गाड्या बीट मार्शलमध्ये सामील करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते आज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बीट मार्शलमधील वापरण्यात येणाऱ्या दुचाकींची सातारा शहरातून फेरी काढण्यात आली. या बीट मार्शल गाड्यांमध्ये नागरिकांना आव्हान करण्यासाठी पीए सिस्टम, सायरन सिस्टम, रिव्हाव्हींग दिवे बसवण्यात आले आहेत. तसेच नियंत्रण कक्षाबरोबर तात्काळ संपर्क साधता यावा, यासाठी अत्याधुनिक हॅन्डल फ्री वॉकी टॉकी पुरवण्यात आले आहेत. याद्वारे पोलिस कंट्रोल रूमला तात्काळ संपर्क करता येणार आहे.

No comments