Header Ads

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 'मराठी भाषिक कौशल्य विकास' राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन satara

सातारा : सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग व जिल्हा माहिती कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन सप्ताह व मराठी भाषा गौरव दिन निमिताने गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात मराठी भाषिक कौशल्य विकास या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते होणार आहे तसेच प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य ,रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे हे उपस्थित राहणार आहेत . या कार्यशाळेत उपप्राचार्य  डॉ. अनिसा मुजावर, प्रा.डॉ .कांचन नलावडे, डॉ.मानसी लाटकर , बी.व्होक चे प्रमुख प्रा.संपतराव पिंपळे, प्रा.शैलेश थोरात, प्रा.डॉ सादिक तांबोळी, प्रा.डॉ .संजयकुमार सरगडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी रेखाटन, निबंध लेखन ,चित्रकला, पोस्टर निर्मिती ,म्हणी संकलन,घोष वाक्य लेखन, मराठी गीत गायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. या कार्यशाळेस मराठी व अन्य सर्व भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, विविध महाविद्यालयातील, प्राध्यापक , प्रसार माध्यमात काम करणारे विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज महाविद्यायात रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. मराठी भाषेच्या पदवी ते पदवीत्तोर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा केंद्रीत ठेवून अतिशय सुबक व आशयपूर्ण रांगोळ्या रेखाटल्या होत्या.त्याची पहाणी उपप्रचार्य डॉ. अनिसा मुजावर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केली.

No comments