Header Ads

माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख आ.शिवेंद्रराजेंच्या भेटीला satara

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बँकेचे विद्यमान चेअरमन आ.शिवेंद्रराजे भोसले यांची काही दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेतली होती. त्यापाठोपाठ आता राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांनी देखील निवास्थानी येऊन आ.शिवेंद्रराजेंची भेट घेतली आहे. या भेटीबाबत उपस्थितांना विचारले असता केवळ सदिच्छा भेट असयाचे सांगत असे तरी, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुशंघाने चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या भेटी दरम्यान बँकेचे संचालक अनिल देसाई व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थितीत होते.

No comments