Header Ads

उदयनराजेंच्या मंत्रिपदासाठी त्याने लिहिले चक्क रक्ताने पत्र satara

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकाने स्वतःच्या रक्ताने उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर खासदार करून केंद्रात मंत्रीपद मिळावे, ही मागणी करणारे पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. नीलेश सूर्यकांत जाधव असे या उदयनराजेप्रेमी युवकाचे नाव आहे.

नीलेशचे हे पत्र आज सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यात तसेच राज्यात आणि देशात अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. या सर्वांना उदयनराजे पुन्हा खासदार आणि केंद्रात मंत्री झालेले पहायचे आहे. असाच एक बोंडारवाडी येथील नीलेश जाधव हा त्यांच्यावर प्रेम करणारा तरुण तेज ग्रुपमध्ये कामाला आहे. नीलेश मुंबईत कामानिमित्त गेला होता. आज त्याचा वाढदिवस असल्याने वाढदिवसानिमित्ताने सकाळीच तो उदयनराजेंसाठी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहायला बसला. त्याने पत्र लिहिले अन् त्याने ते पाठविले देखील. त्याने पत्रात म्हंटले की, आमच्या घरी माझ्या आजोंबापासून छत्रपती उदयनराजे भोसले व त्यांच्या कुटुंबांवर आमचे प्रेम आहे. माझेही राजेंवर खूप प्रेम आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्रीपद मिळावे अशी माझी इच्छा आहे. ती  मी माझ्या रक्ताने मांडली आहे, असे त्याने लिहिले आहे.

No comments