Header Ads

कुटुंबाला सतत त्रास देत असल्याने वैतागलेल्या वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घालून केला पोटच्या मुलाचा खून phaltan

फलटण : मद्यपान करून कुटुंबाला सतत त्रास देत असल्याने वैतागलेल्या वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना गुणवरे ता. फलटण येथील नाळेमळा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुभाष लक्ष्मण नाळे वय-३८ असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुभाष नाळे याला दारूचे व्यसन होते. तो घरातील लोकांना तसेच त्याच्या बहिणीला सतत त्रास देत होता. या त्रासाला घरातील कंटाळले होते. शुक्रवारी मध्यरात्री सुभाष नाळे हा घरातील दुसऱ्या खोलीत तो झोपला होता. सुभाषला पत्नी, दोन मुले असा परिवार असून, ते शुक्रवारी परगावी गेले होते. त्यामुळे घरात सुभाष आणि त्याचे वडील असे दोघेच होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास लक्ष्मण बाळू नाळे वय-६० यांनी कुऱ्हाडीने वार करून सुभाष याचा खून केला. या घटनेची फिर्याद शंकर बाळू नाळे रा. गुणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले तपास करीत आहेत.

No comments