Header Ads

पाटण येथील सुंदरगडावर महाशिवरात्र उत्साहात; दर्शनाला शिवभक्त भाविकांची गर्दी patan

पाटण : छत्रपती शिवकाळातील पाटण महालात प्रमुख असलेल्या सुंदरगडावर (घेरादात्तेगड) असलेल्या "गजलक्ष्मी तलवार" विहिरीतील शंकराच्या मंदिरातील शिवलिंगावर महाशिवरात्र निमित्ताने पंचामृत दुग्धा अभिषेक, पुजा पाठ, महाआरती करून छत्रपती शिवभक-शिवमावळ्यांनी महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरी केली. महाशिवरात्र निमित्ताने सुंदरगडावरील "गजलक्ष्मी तलवार" विहिरीतील शंकराच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

पाटण येथून जवळच असलेल्या सुंदरगडावर काळ्या कातळात खोदलेली भव्य "तलवार" आकाराची विहिरी आहे. या विहिरीतच मधोमध शंकराचे "शिवलिंग" असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या अगदी वर "गजलक्ष्मी" हत्ती कोरलेला आहे. यावरून या विहिरीला "गजलक्ष्मी तलवार विहिर" म्हणले जाते. या तलवार विहिरीच्या पात्यापासून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यां कोरलेल्या आहेत. या पाय-या वरून विहिरीत उतरले की डाव्या बाजूला "शिवलिंग" असलेले शंकराचे मंदिर आहे. इतिहासातील कलेचा अद्भुत नमुना असणारी हि  "गजलक्ष्मी तलवार वीहिर" सुंदरगडाचे आकर्षण आहे. या विहिरीत असलेल्या शिवमंदिरात सुदंरगड संवर्धन समितीच्या शिवभक्त मावळ्यांनी व ग्रामस्थांनी महाशिवरात्र उत्सव साजरा केला. या मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत अभिषेक, पुजा- महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.  महाशिवरात्र निमित्त शिवभक्त पर्यटक यांनी "गजलक्ष्मी तलवार" विहिरीतील शिवमंदिरात गर्दी केली होती. यावेळी अविनाश (काका) पराडकर यांनी मंत्र उच्चार करताना शिवलिंगावर यशवंतराव जगताप, महादेव खैरमोडे, मनोहर यादव, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, यसुफ हकीम आदी मंडळींनी दुग्धाअभिषेक केला. व महापुजा संपन्न केली.

सुंदरगडावरुन आजुबाजुच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य सह्याद्रीच्या रांगा, कोयना नदीचा नागमोडी प्रवाह, भैरवगड, वसंतगड, गुणवंतगड या किल्ल्यांचे सहज होणारे दर्शन, किल्ल्यावरून दिसणारा सुर्यास्त आणि पायथ्याला असणाऱ्या पाटण शहराचा परिसर दिवसेंदिवस शिवभक्त पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. याबरोबर किल्ल्याच्या  महाव्दारात भव्य असणा-या श्रीगणेश आणि वीर हनुमानाच्या आकर्षक मृर्ती देखील पाहाण्यास व त्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

No comments