Header Ads

संत निरंकारी मंडळाच्या वतीने पाटणला स्वच्छता अभियान patan

पाटण : संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन पाटण ब्रांच यांच्यावतीने सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय पाटण येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पाटण ब्रांचचे प्रमुख अॅड.पी.एल.मोरेजी, राजेंद्र कवर, सुशीला देसाई, बाबुराव शेळके तसेच चाफळ ब्रांच सेवा जिल्हाधिकारी कृष्णा जाधवजी यांचेसह वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत यादव यांची उपस्थिती होती. संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या पाटण ब्रांच, चाफळ ब्रांच, तारळे ब्रांच यांच्यावतीने आयोजित केलेल्या हया अभियानात रुग्णालय व परिसरातील स्वच्छता करण्यात आली. संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन यांचे सौजन्याने २३ फेब्रुवारी रोजी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या ६६ व्या जयंती निमित्त देशभरात सफाई अभियान आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अभियानामध्ये संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनचे वालंटियर आणि निरंकारी मिशनचे सेवादल बंधू-भगिनी मिळून देशभरातील ४०० शहरांतील ११६६ सरकारी रुग्णालयात सफाई अभियान राबवून श्रमदान केले.

No comments