Header Ads

चाफळ विभागातील सूर्याचीवाडी गावामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी patan

सातारा : पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील सूर्याचीवाडी गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसमर्थ स्मारक शिंगणवाडी ते सूर्याचीवाडी पर्यंत मशाल नेण्यात आली. शिवचरित्रकार सोमनाथ महाराज कोपर्डे यांचे शिवजयंतीस्थळी व्याख्यान झाले. तसेच शिवजयंती निमित्ताने जिल्हा परिषद शाळा सुर्याचीवाडी विद्यार्थ्यांनी नृत्य कला सादर केली. गावचे सुपुत्र शिवभक्त सिद्धेश शंकर भांडुगळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गावचे  ग्रामस्थ व दुर्गादेवी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्णपणे उत्साहात आणि आनंदात शिवजयंती साजरी करण्यात आली.

No comments