Header Ads

कवडेवाडी फाटा-पिंपळोशी रस्त्याची दुरावस्था; अंदाजपत्रकाप्रमाणे काम करुन देण्याची ग्रामस्थांची मागणी patan

पाटण : पाटणच्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून ३०५४ जिल्हा नियोजन रस्ते निधीतून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील मौजे पिंपळोशी-कवडेवाडी फाटा रस्ता अंदाजे ८०० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र ह्या रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून  काम अपूर्ण अवस्थेतच असुनही सबंधित ठेकेदाराचे नव्वद टक्के बिल अदा करण्यात आले असून, ठेकेदाराने अंदाज पत्रकानुसार रस्त्याचे काम केलेले नाही असा आरोप पिंपळोशी ता.पाटण येथील ग्रामस्थांनी केला असुन अंदाजपत्रका प्रमाणेच रस्त्याचे काम झाले पाहिजे असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

या ठरावात म्हटले आहे की, सन २०१८-१९, ३०५४ जिल्हा नियोजन निधीतून मंजूर झालेल्या  पिंपळोशी-कवडेवाडी फाटा रस्ता  ग्रामीण मार्ग १२४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला होता. या कामाच्या अंदाजपत्रकात संबंधित रस्त्याचे मातीकाम, खडीकरण, डांबरीकरण, सिलकोट, गटरकाम आदी कामांचा समावेश असुन, सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने जून मध्येच खडीकरण व डांबरीकरण केल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदरचे काम आज अखेर अपूर्ण आहे. तसेच मुरूमाने साईड पट्टा भरलेल्या नाहीत. कवडेवाडी फाटा (बौद्ध वस्ती) येथील वाहणारे पाणी निघणे कामे रस्त्यात पाईप टाकलेली नाही. परिणामी पहिल्याच पावसाने रस्त्यावरील डांबर निघून गेले असुन, खडी उघडी पडल्यामुळे सध्या वाहन चालकांसह गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांना रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून वाहन घसरुन छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याचे काम आज अखेर अपूर्ण असून देखील सदर कामाचे संबंधित अभियंत्यांनी ठेकेदाराचे  नव्वद टक्के बिल अदा केलेले आहे. या कामाची वारंवार ग्रामस्थांकडून तोंडी तक्रार संबंधित अधिकारी जि.प. बांधकाम उपविभाग पाटण यांना देण्यात आलेली होती. तरी रस्त्याचे काम आज अखेरपर्यंत अपूर्ण अवस्थेतच आहे. तरी या रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार त्वरित पूर्ण करण्यात यावे. अशी मागणी करुन याबाबतचा ठराव पिंपळोशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेला आहे. या ग्रामसभेतील ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार पाटण, बांधकाम उपविभाग. जिल्हा परिषद सातारा, सहाय्यक संशोधन अधिकारी प्राथमिक प्रयोगशाळा पुणे यांना देण्यात आल्या असून, सदर रस्त्याच्या कामाचे  नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

संबंधित रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्ता पुर्णपणे उखडून बिकट अवस्था झाली आहे. तरी अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याचे काम करुन ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी.

सुरेश निकम :- शिवसेना शाखा प्रमुख, पिंपळोशी.

No comments