Header Ads

दहिवडी येथील आंबेडकर स्मारक भवनासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ.जयकुमार गोरे man

दहिवडी : दहिवडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर त्यांच्या दहिवडीतील भेटीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव समारंभ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम दहिवडी येथील आंबेडकर नगर मध्ये  शुक्रवारी दि १४ फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. १५ फेब्रुवारी १९४६  मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहिवडी येथे येऊन ज्याठिकाणी सर्व समाजबांधवांना मार्गदर्शन केले होते त्याठिकाणी दहिवडीतील लोकांनी पत्र्याचे छोटेसे स्मारक उभे केले होते. याच ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यासाठी जयकुमार गोरे यांनी ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आ.जयकुमार गोरे, दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा. सतिश जाधव उपनगराध्यक्ष मा. सुप्रिया शिंदे, नगरसेवक धनाजी जाधव, ललिता जाधव, नीलिमा शिंदे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र इंगवले, अर्जुन काळे, अतुल जाधव, सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन मा.बळवंत पाटील, डॉ. पालवे, डॉ. कर्णे व डॉ. कर्णे मॅडम, शिवाजी शिंदे, महेश कदम, किशोर साळुंखे, दत्तात्रय देशमाने, नितीन कदम तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रसंगाचे अमृतम्होत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी दि १४ व १५ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पहिल्या दिवशी भूमीपुजनाचा कार्यक्रम आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजय खरात सर यांनी केले.  नगरसेविका सौ. अर्चना खरात यांनीडॉ. बाबासाहेब आंबेडकर   स्मारक भवन साठी केलेल्या संघर्षाची भावना व्यक्त केली. तसेच स्मारक भवनाजवळ वाचनालय व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी मा. आमदार जयकुमार गोरे यांनी सर्व माण खटाव तालुक्यातील सर्वात सुंदर स्मारक भवन या ठिकाणी उभे होणार असून डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीसाठी ३५ लक्ष रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करू व भव्य दिव्य स्मारक भवन निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. काळेल मॅडम व तोरणे सर यांनी केले. शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी भीमगीतांचा सुरेल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

No comments