Header Ads

गोडवलीच्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु mahab

पाचगणी : गोडवली (खिंगर) येथील तुषार मोरे या युवकाचा उपचारासाठी पाचगणीहुन वाईकडे जाताना अॅम्बुलेन्समध्येच मृत्यु झाला आहे. याबाबत पाचगणी पोलीस स्टेशनला संतोष नामदेव मोरे रा.गोडवली (खिंगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीवरुन, पुतण्या तुषार मोरे यांस अस्वस्थ व घाम आल्याने त्यास डॉक्टराच्या सल्ल्याने पाचगणी येथुन वाई येथे उपचारासाठी घेवुन जात असताना तो मयत झाला.  त्याचे मृत्यूचा तपास व्हावा म्हणुन मजकुराच्या खबरीवरुन आकस्मित मयत रजिस्टर करुन अखेर रिपोर्ट उपविभागीय अधिकारी याच्याकडे पाठवला आहे. प्राथमिक तपास सहाय्यक फौ.कुलकर्णी करत आहेत.

No comments