Header Ads

वुहानमध्ये असलेल्या साताऱ्याच्या तरुणीशी आरोग्य राज्यमंत्र्यांनी साधला संवाद maha

मुंबई : कोरोना विषाणुचा उद्रेक चीनच्या ज्या वुहान प्रांतात झाला तेथे  मुळची सातारा येथील असलेली अश्विनी अविनाश पाटील ही तरुणी सध्या अडकली आहे. काल तिने सोशल मिडीयावरुन मायदेशी परतण्याच्या केलेल्या आवाहनाची दखल घेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अश्विनीशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. तिला दिलासा देत मायदेशी परतण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यानी सांगितले.

दरम्यान, राज्यमंत्री श्री.पाटील यांनी काल चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अश्विनी पाटील हिला सुखरुपपणे मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अश्विनीला लवकरात लवकर मायदेशी आणले जाईल, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले. मारे दोन आठवड्यापुर्वीच महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी भारतात परतले असून त्यांना आणण्यासाठी राज्यमंत्री श्री. पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. हे विद्यार्थी सध्या निरिक्षणाखाली असून लवकरच त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल. आरोग्य विभागामार्फत त्यांना घरी सोडण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे राज्यमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

No comments