Header Ads

बेताल वक्तव्य कराल तर जिल्ह्यात फिरू देणार नाही : उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव khatav

पुसेगाव : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आशिष शेलार यांचा शिवसेना कोरेगाव विधानसभा यांच्याकडून निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय महाआघाडीच्या सरकारकडून घेण्यात येत आहेत. या निर्णयावर महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य जनता या निर्णयाचे स्वागत करत आहे. विरोधी पक्षातील काही नेते बेताल वक्तव्य करून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अशा वक्तव्यांना शिवसेना कधीच खपवून घेणार नाही. यापुढे असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सातारा जिल्ह्यामध्ये फिरू देणार नसल्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला.

अशिष शेलार यांच्या बेताल वक्तव्याच्या  निषेधार्थ कोरेगाव शहर शिवसेनेच्यावतीने हाताला काळ्या फिती बांधून व घोषणा देत कोरेगाव जुना स्टँड ते तहसीलदार कार्यालय पर्यत शिवसैनिकांनी निषेध रॅली काढली. शिवसेना अंगार है अशिष शेलार भंगार है. नीम का पत्ता कडवा है अशिष शेलार भडवा है.... अशा घोषणा देत शिवसैनिकांनी शेलारांचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, कोरेगाव तालुकाप्रमुख सचिन झांजूर्णे, सातारा तालुकाप्रमुख दत्ता नलावडे, खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे, संदीप जाधव, दिलीप जाधव, जोतीराम गवळी, संजय केंजळे, निखिल कदम, रमेश बोराटे, रमेश बर्गे, अनिकेत बर्गे, अक्षय पवार, हर्षल जोशी, शशिकांत घाडगे, रामभाऊ जगदाळे, यशवंत जाधव, मुगटराव कदम, दिलीप वाघमोडे, संदीप नलवडे, शाहीर जरंडे, आमीन आगा, जेष्ठ शिवसैनिक महिपती नाना डंगारे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment: