Header Ads

नेर तलावात मृतदेह आढळला khatav

खटाव : बुध ता. खटाव येथील शैलेश दिलीप सूर्यवंशी वय-३२ यांचा नेर तलावामध्ये संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला. शैलेश यांचा चुलत भाऊ मंदार सूर्यवंशी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मांजरवाडी ता. खटाव येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. शनिवारी ता.२१ सकाळी ११ च्या सुमारास वडूजला सोसायटीच्या कामासाठी जातो, असे सांगून निघून गेले. त्यानंतर शैलेश सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही, म्हणून त्यांची पत्नी गौरी यांनी मंदारकडे चौकशी केली. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांकडे, गावात व त्यांच्या सहकारी मित्रांकडे फोनवरून चौकशी करू लागले. मात्र, त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळू न शकल्याने सोमवारी ता.२४ मंदार व चुलत भाऊ उदय सूर्यवंशी यांनी शैलेश हरवल्याबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी पुसेगाव पोलिस ठाण्यात आले असता तिथे त्यांना नेर तलाव्यात मृतदेह असल्याचे समजले. खात्री करण्याकरिता दोघेही नेर तलाव्याकडे गेले असता मृतदेह शैलेशचाच असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

No comments