Header Ads

सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामाबाबत शिवसैनिक वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत; १० दिवसांनी तीव्र आंदोलन छेडणार : प्रताप जाधव khatav

पुसेगाव : काही दिवसापुर्वी सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम निकृष्ट असल्याचे पुरावे देत, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीस मदत, शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी व कामाचा दर्जा उत्तम प्रतीचा व्हावा या मागणीसाठी शिवसेनेने आग्रही भूमिका मांडली होती. या मार्गाच्या कामा संदर्भात सबंधित विभाग, जिल्हाधिकारी व मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. मात्र या मार्गाचे काम आजअखेर जैसे थे आहे. येणाऱ्या १० दिवसात काही हालचाल न झाल्यास शिवसेनेच्यावतीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. आणि यानंतर होणाऱ्या परिणामास शिवसैनिक जबाबदार राहणार नाहीत असा खणखणीत इशारा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.     

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामासंदर्भात सबंधित विभाग, जिल्हाधिकारी व मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या मार्गाच्या निकृष्ट दर्जाची माहिती शिवसैनिकांनी दिली होती. यावर स्वतः मंञी शिंदे यांनी संबंधित विभागास फोन करून खडसावले होते. व दोन दिवसात अहवाल सादर करा असे आदेश दिले होते. परंतु गेली चार दिवस झाले तरी कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली या विभागाकडून दिसून आलेली नाही. आज हे पथक सातारला आले यावेळी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. सर्व निकृष्ट झालेल्या कामाची पाहणी आज या पथकाने केली खचलेले पूल, रस्त्याला पडलेल्या भेगा, शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान, सुरक्षितेसाठी नसलेला कोणते उपाय, ठेकेदाराचा मनमानी कारभार व झालेलं निकृष्ट कामाची पाहणी पथकाने केली. त्याचा लेखाजोखा पथकाने घेतला असून, संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करू अशी हमी या पथकाने दिली. या मार्गाचे नित्कृष्ठ काम त्यांच्या निदर्शनास आले असून, येत्या दहा दिवसात निकृष्ट झालेली कामे व्यवस्थित न केल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा  जाधव यांनी दिला आहे. आज सहा दिवस बंद असलेल्या रस्त्याचे कामाची सुरुवात झाली असून, सुरू केलेल्या कामाचा दर्जा चांगला मिळावा अशी अपेक्षा शिवसैनिकांच्यावतीने करण्यात आली आहे. संबंधित काँन्टक्टर व स्थानिक बड्या नेत्यांची मिलीभगत आहे. असा थेट आरोप यावेळी प्रताप जाधव यांनी केला. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अजून दहा दिवस वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र दहा दिवसांनी तीव्र आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. आणि यानंतर होणाऱ्या परिणामास शिवसैनिक जबाबदार राहणार नाहीत असा खणखणीत इशारा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे. यावेळी कोरेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे, कोरेगाव तालुका प्रमुख सचिन झांजुरणे, सातारा तालुका प्रमुख दत्ता नलवडे, कोरेगाव शहरप्रमुख अक्षय बर्गे, खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments