Header Ads

किल्ले सदाशिवगडावरील दरीत अडकलेल्या दोघा मुलांची सुटका karad

कराड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर येताना सुमारे अडीचशे फुटाहून अधिक खोल दरीत अडकलेल्या दोघा मुलांची रविवारी दुपारी सुटका करण्यात आली. किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी २००८ पासून कार्यरत असणाऱ्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी यासाठी घेतलेल्या परिश्रमास यश आले. या घटनेमुळे चार दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील हडपसर किल्ल्यावरील आणि सुमारे दोन महिन्यांपूर्वी सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत यांच्याबाबत झालेल्या अपघातांची आठवण होऊन क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता. मात्र प्रसंगावधान राखत सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments