Header Ads

सीएए मागे घेण्याबाबत अमित शहांना विनंती करणार; योगेंद्र यादव व पद्मश्री डॉ. गणेश देवी यांची माहिती karad

कराड : डिसेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने केलेला सुधारित नागरिकत्व कायदा संविधान विरोधी आहे. केंद्र सरकारची ही मोठी चूक असून सरकारने हा कायदा त्वरित मागे घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही भारत जोडो हे अभियान सुरू करत असून २२ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशभर जनजागृती केली जाणार आहे. तसेच आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून, त्यांना नागरिकत्व कायदा मागे घेण्याबाबत विनंती करणार आहे, अशी माहिती स्वराज्य अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्यासह पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांनी दिली.

उंडाळे ता. कराड येथील स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीकडून स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ४६ व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी आयोजित केले जाणारे ३७ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन मंगळवारी संपन्न झाले. या अधिवेशनात बडोदा (गुजरात) येथील आदिवासी भाषा संशोधन प्रकाशन केंद्राचे संस्थापक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार स्वराज्य अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राज्य शासनाने क्षणाचाही विलंब न लावता विधानसभेत एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय नागरिकत्व सूचीला विरोध करण्यासाठी त्याबाबतचा ठराव संमत करावा. जर असा ठराव केला गेला, तरच आपण राज्य शासन धर्मनिरपेक्ष आहे असे मानू असेही योगेंद्र यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments