Header Ads

जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार karad

कराड : जखिणवाडी ता. कराड येथे बिबट्याने हल्ला करत शेळ्यांच्या नरड्याचा चावा घेऊन तीन शेळ्या ठार केल्या. दरम्यान, शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित आरडाओरड केल्यामुळे दोन कोकरे बचावले. पाटील मळ्यात किसन पाटील यांच्या वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जागीच दोन शेळ्या ठार झाल्या. तर एक गंभीर जखमी झाली. त्या जखमी शेळीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा वनविभागाच्यावतीने करण्यात आला. दरम्यान जखिणवाडी ग्रामस्थांनी तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

No comments