Header Ads

वनवासमाची येथे भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू karad

कराड : ऊस वाहतूक करणारी टोळी घेऊन साताऱ्याकडे निघालेल्या ट्रकटर ट्रॉलीला आयशर टेंपोची पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात आयशर टेंपोचा ड्रायव्हर पुटाप्पा जयाप्पा बेनकरशेट्टी वय-२५ रा.अगळवाडी जि.बेळगाव हा जागीच ठार झाला. तर ऊस टोळीतील नामदेव साखरे व दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात ए जन गंभीर जखमी झाला आहे. वनवासमाची ता.कराड येथे महामार्गावर बुधावारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments