Header Ads

बोंडारवाडी धरणाकरीता प्रशासनाकडून वेळकाढूपणा झाल्यास किंमत मोजावी लागणार : आ. शिवेंद्रराजेंचा प्रशासनाला इशारा jaoli

मेढा : जावली तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याकरीता पायपीट करावी लागत आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांनी योग्य भुमीका घेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सदैव सोडवण्याकरीता तसेच शेतीकरीता पाण्याचे व्यवस्थापन करुन जावलीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता सहकार्य करावे, अशी भुमीका स्पष्ट करत यापुढे प्रशासनाने बोंडारवाडी धरणाकरीता वेळकाढुपणा केल्यासयाची त्याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल असा सज्जड दम वजा इशारा आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी मेढ्यातील चक्काजाम आंदोलनात दिला. तर हक्कासाठी पर्यायी मार्ग खुले असल्याची भुमीका व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला.

जलसपंदा विभागाकडुन बोंडारवाडी धरणाचा ट्रायलपीटच्या कामामध्ये चालढकल केली जात असल्याने लवकरात लवकर ट्रायलपीटचे काम जलसंपदा विभागाने करावे. तसेच ट्रायलपीटच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. बोंडारवाडी गावातील लोकांना मनामध्ये कोणतीही कितुं पंरतु न आणता समोर चर्चेला तयारी दाखवावी आमदार म्हणुन माझी सहकार्याची भुमीका असुन, आधी पुनर्वसन नतंर धरण हा कायदाच असल्यामुळे बोंडारवाडी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. बोंडारवाडी धरणामुळे पर्यटनाला चालना मिळणार असुन, स्थानिक भुमीपुत्रचा रोजगार बोंडारवाडी धरनामुळे मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील बोंडारवाडी ग्रामस्थाच्या मागण्याचे पाठपुरावा करत मार्ग लवकर काढावा.

बोंडारवाडी धरणाची मार्गक्रमण कृती समित्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहील. अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी, निधी साठी बजेट तरतुद करण्याकरीता जावलीकरांसाठी सदैव तत्पर असुन जावलीच्या जनतेकरीता आम्ही सर्वमंडळी प्रयत्न करणारच असा विश्वास व्यक्त केला. बोंडारवाडीच्या धरणाकरीता प्रशासकीय यंत्रणेने वेळकाढुपना त्वरीत बंद करावा, असा इशारा यावेळी आ. शिवेंद्रराजेंनी दिला. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम, ज्ञानदेव राजणे, कृती समितीचे अध्यक्ष विजय मोकाशे, जि.प.सदस्य अर्चना राजणे, कांताताई सुतार, विजय सुतार, राजु धनावडे यांसह जावलीतील प्रमुख सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 

No comments