Header Ads

तारगावातून ऊसतोड मुकादमाचे अपहरण crime

सातारा : तारगाव, ता. कोरेगाव येथून रविवारी रात्री जरंडेश्‍वर शुगर मिलचे ऊसतोड मुकादम विष्णू शंकर बारगजे (वय 50) यांचे अज्ञात चौघा जणांनी अपहरण केल्याची तक्रार रहिमतपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. जरंडेश्‍वर शुगर मिलसाठी ऊसतोड टोळीचा मुकादम म्हणून विष्णू बारगजे हे तारगाव गटासाठी काम पाहत होते. ते बारगजवाडी (लोणी, ता. शिरुर कासार, जि. बीड) गावावरून रविवारी रात्री आठच्या सुमारास तारगाव येथील टोळीच्या खोपटावर पोहोचले होते. त्यानंतर काही वेळातच चारचाकी वाहनातून चार ते पाच जण त्यांची चौकशी करत खोपटावर आले. त्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे एका ट्रॅक्टर चालकाने पाहिले. या चालकाने हा घडलेला प्रकार संबंधित विभागासह नातेवाईकांना कळवला. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, न सापडल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाला.

No comments