Header Ads

तडीपार असलेल्या दोन सराईत संशयितांकडून घरफोडी-चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड crime

सातारा : मालमत्ता चोरी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार संकेत दिनेश राजे व संजय एकनाथ माने दोन्ही रा. भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा यांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून सातारा शहरात वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानुसार, त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यास ताब्यात घेणे बाबत सूचना दिल्या होत्या.

दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रसन्न ज-हाड हे पोलीस पथकासह सातार शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना वरील दोन्ही तडीपारीत गुन्हेगार हे सातारा शहरामध्ये गुरुवार परज येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार गुरुवार परज येथे जावून त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असलेल्या मोठया इन्डैटरच्या बॅट-या बाबत विचारणा केली असता त्यानी दि. २१/०२/२०२० रोजी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. त्यांचेकडून चोरी केलेल्या ५५०००/- रु किंच्या बॅट-या हस्तगत करण्यात आल्या असून त्यांच्यावर तडीपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अधिक तपासासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, यांच्या सूचनेप्रमाणे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री प्रसन्न ज-हाड, पो.ह. सुधीर बनकर, तानाजी माने, मुबीन मुलाणी, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अजित करणे, निलेश काटकर, विशाल पवार, विजय सावंत यांनी केली. 

No comments