Header Ads

वडूज येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ७८ हजारचा मुद्देमाल जप्त crime

वडूज : खटाव तालुक्यातील वडूज येथील आदिनाथ नगर येथे रविवार दि. २३ रोजी रात्री ११ च्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. सदर विना परवाना जुगार अड्डा हा शिवकांत चंद्रकांत खुडे रा.वडूज ता. खटाव याचा असून, रोख रक्कम  ४० हजार ६५० रुपये, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ७८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विना परवाना जुगार अड्डा चालकासह अन्य चार जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राहुल सरतापे करीत आहेत.

No comments