Header Ads

५० हजाराची लाच घेणारा लिपिक एसीबीच्या ताब्यात; चौकशीअंतीच ऑनलाईन मलिदा नेमका कुठे मुरला हे होणार स्पष्ट crime

सातारा : सातारा तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल ५० हजाराची ऑनलाईन लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. एवढी मोठी लाच नक्की लिपिकाला हवी होती की, अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात या लिपिकाच्या टोपीखाली दडलेत याची चर्चा सध्या साताऱ्यातील तहसीलदार ऑफीसमध्ये कामे रखडलेल्यांमध्ये सुरु आहे. या घटनेत पुनर्वसनाचे रखडलेले काम करण्यासाठी ५० हजारांची ऑनलाइन लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाचे नाव रमाकांत फडतरे असे आहे. मात्र रमाकांत फडतरे यांचा बळी देणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्‍यातील एकाचे जमीन पुनर्वसनाचे काम सातारा तहसील कार्यालयात प्रलंबित होते. ते काम करण्यासाठी लिपिक फडतरे याने ५० हजाराची लाच मागितल्याची सातारा एसीबीला तक्रारदाराने माहिती दिली होती. त्यानंतर एसीबीने तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी सायंकाळी सापळा लावून लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी फडतरे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर फडतरे याने लाचेची रक्कम त्याच्या बॅंक खात्यात भरण्यास तक्रारदाराला सांगितले. दरम्यान, लिपिक फडतरे यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची एसीबीने अधिक चौकशी केल्यानंतरच ऑनलाईन मलिदा नेमका कुठे मुरला हे स्पष्ट होणार आहे.

No comments