Header Ads

दुचाकी, चारचाकी, बँक एटीएम चोरी, मंदिरातील दानपेटी फोडून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या crime

सातारा : सातारा शहरात दुचाकी, चारचाकी, बँक एटीएम चोरी, मंदिरातील दानपेटी फोडून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाहूपुरीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जुबेर शबाब शेख रा.शुक्रवार पेठ, सातारा व बशीर उर्फ बादशाह वली शेख रा.आकाशवाणी झोपडपट्टी,सातारा या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा तपास करताना शाहूकला मंदिरजवळील अपार्टमेंटमधून एक चारचाकी चोरताना एक संशयित आरोपी मिळून आला होता. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अजून दोन साथीदारांच्या मदतीने सदाशिवपेठ, सातारा येथून ऍक्टिवा मोटारसायकल, शुक्रवार पेठेतील विश्वविनायक मंदिराची दानपेटी, त्याचबरोबर मंगळवार पेठेतील एस.बी.आय. बँकेचे एटीएम व राजवाडा परिसरातील राजधानी टॉवरमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. संशयितांकडून ३४,१३९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई स.पो.नि विशाल वायकर, स.पो.नि संदीप शितोळे, हिम्मत दबडे, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, सचिन माने, तुषार पांडरपट्टे, राजकुमार जाधव, मनोहर वाघमळे, आशिष कुमठेकर, अजित माने सुनील भोसले यांनी केली.

No comments