Header Ads

खून, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणातील फरारी आरोपी अटकेत crime

सातारा : खून, अ‍ॅट्रॉसिटी यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास नागठाणे, ता. सातारा येथून अटक केली. अमित उर्फ कन्हैय्या उर्फ कान्या सुनील साळुंखे वय-२९, रा. नागठाणे, ता. सातारा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित साळुंखे याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात खून आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्ह्यामध्ये जामीन मिळाला होता. परंतु तो न्यायालयात सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला निरंतर पकड वॉरंट काढले होते. साळुंखे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेण्याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज जाधव यांनी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नागठाणे येथे शुक्रवारी जाऊन अमित साळुंखेला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नितीन गोगावले, मुनिर मुल्ला, निलेश काटकर आदींनी केली.

No comments