Header Ads

महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली; दरोड्याचा गुन्हा दाखल crime

सातारा : वाटेत अडवून महाविद्यालयीन युवकाला मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय उर्फ पिल्या नलवडे, मंगेश चव्हाण, अमर चौगुले, अजय पवार, सचिन पवार सर्व रा. बोगदा परिसर, समर्थ मंदिर सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,चेतन संतोष पवार वय २१, रा. डबेवाडी, ता. सातारा हा महाविद्यालयीन युवक दि. ७ रोजी रात्री मित्रासह दुचाकीवरून घरी निघाला होता. यावेळी बोगदा परिसरातील पॉवर हाऊसजवळ वरील पाचजणांनी त्यांना अडवले. त्यानंतर लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच चेतनच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेली. या प्रकारानंतर चेतनने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

No comments