Header Ads

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले crime

सातारा : तक्रारदार मामाच्या मुलास फसवणुकीचे गुन्हयात आरोपी न करण्याकरीता फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी यांनी तब्बल ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी यांनी तक्रारदार यांचेकडे २० लाख रुपयांची मागणी करुन त्यापैकी ४ लाख रुपये पहिला हप्ता लाच मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक १७/०२/२०२० रोजी दिली. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे दिनांक १७/०२/२०२० रोजी पडताळणी कारवाईमध्ये श्री.ज्ञानेश्वर अशोक दळवी, पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक- फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांचे मामाचे मुलास फसवणुकीचे गुन्हयात आरोपी न करण्याकरीता २० लाख रुपयांची मागणी करुन त्यापैकी ४ लाख रुपये पहिला हप्ता लाच मागणी करुन ती लाच स्विकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या विरूध्द फलटण पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपअधीक्षक श्री.अशोक शिर्के हे करीत आहेत.

सदरची कारवाई अशोक शिर्के पोलीस उपअधीक्षक, पो.ह. भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुखे, पो.ना. संजय अडसुळ, प्रशांत ताटे, पो.ना श्रद्धा माने, पो.कॉ. संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, पो.कॉ.शितल सपकाळ, चालक पो.ना मारुती अडागळे यांनी केली.

No comments