Header Ads

घरफोडी व चोरी करणारे दोन गुन्हेगारांना जेरबंद crime

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, दोन इसम शिरवळ एस. टी. स्टॅन्ड येथे पांढऱ्या रंगाची झेन कार क्रमांक एमएच-१२-एएफ-३६७० मधून चोरी केलेले मोबाइल विक्री करण्याकरिता येणार आहेत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा ,सातारा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आनंदसिंग साबळे यांना सदर पथकासह जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले .त्यानुसार सादर पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचला बातमी प्रमाणे दोन इसम पांढऱ्या रंगाची झेन कार क्रमांक एमएच-१२-एएफ-३६७० मधून शिरवळ एस. टी. स्टॅन्ड परिसरात संशियतरित्या वावरताना आढळून आले. त्यांना थांबून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले ११ मोबाईल फोनव एक एल.सी. डी टीव्ही मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता आणखी दोन साथीदारासोबत मौजे शिंदेवाडी (शिरवळ )ता. खंडाळा गावच्या हद्दीत हॉटेल मांडवली येथे एकास कुऱ्हाडने जबर मारहाण करून त्यांचेकडून दोन मोबाइल फोने चोरी केले असल्याचे सांगितले.

सदर बाबत कार्यालयातील अभिलेख तपासला असता शिरवळ पोलीस ठाणेस गु. र.नं२६६ \२०१९ भा.द.वि. स कलम ४५९,३८०,३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे, मिळून आलेले मोबाइल फोन याबाबतची चौकशी केली असता त्यांनी मोबाइल फोन वेगवेगळ्या बाजारातून चोरी केले बाबत कबूली दिलेली आहे . सदर कारवाई दरम्यान आरोपींकडून एकूण १,०३,०००-रु किमतीची १ फोर व्हीलर कार , ११ मोबाईल फोन व १ एल,सी,डी,टीव्ही असा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाई करीता दोन्ही आरोपिंना शिरवळ पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ,अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस अधीक्षक ,स्थानिक गुन्हे शाखा सातारा सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ,सफौ\पृथ्वीराज घोरपडे ,विलास नागे,जोतीराम बर्गे ,पो. ना मोहन नाचण,योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले , संतोष जाधव ,प्रविण कडव ,पो.कॉ गणेश कापरे ,धिरज महाडीक,केतन शिंदे, वैभव सावंत ,मयूर देशमुख,मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला होता .

No comments