Header Ads

लिपिकाने मारला पाण्याच्या लाखो रुपयांवर डल्ला; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल crime

सातारा : बनावट पाणी परवाने वितरित करून दोन लाख 16 हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कृष्णानगर येथील सिंचन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे ( रा. राजगृह, सत्यमनगर, कोरेगाव रोड , खेड, ता. सातारा) यांच्यावर अपहाराचा गुन्हा सातारा शहर पोलिसात दाखल झाला आहे.

लिपिक संजय कांबळे याच्याकडे कृष्णानगर येथील सिंचन शाखेचा २०१६ ते २०१९ या कालावधीत पदभार असताना स्वत:च्या सह्या करून बनावट पाणी परवाने व नवीन विद्यूत यंत्र परवाने शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. ही बाब काही दिवसांपूर्वी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांमुळे उघडकीस आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या. कांबळे याने पावती पुस्तक अनाधिकाराने आपल्या ताब्यात ठेवले. या पावती पुस्तकाद्वारे दोन लाख १६ हजार ४१ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु या रकमेचा भरणा शासनाच्या खात्यामध्ये केला गेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. कांबळे याने शासनास फसविण्याच्या हेतूने खोटे व बनावट पाणी परवाने व पावत्या तयार करून लाभार्थी शेतकऱ्यांकडून रकमा स्वीकारल्या. अधिकार नसताना सह्या करून पावत्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत कृणानगर येथील जलसंधारण विभागातील सुजित आंबादास कोरे वय-५८, रा. वनवासवाडी, ता. सातारा यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

No comments