Header Ads

मोबाईलवर बोलते म्हणून पत्नीवर गंभीर वार; माण तालुक्यातील लोधवडे गावातील घटना crime

दहिवडी : चारित्र्याच्या संशयावरून व मोबाईलवर कायम बोलत असल्याच्या कारणावरून पत्नीवर सुरीने गंभीर वार केल्याची घटना लोधवडे, ता.माण येथे घडली असून, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी अर्जुन सातपुते वय-३१ असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती अर्जुन रामचंद्र सातपुते वय-३५ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी व त्यांची सासू घरासमोरील चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापवत होत्या. यावेळी अर्जुनने ‘तू एका व्यक्तीशी कायम मोबाईलवर बोलत असतेस,’ असे म्हणत चारित्र्याचा संशय घेऊन सुरीने अश्विनीवर वार केले. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे  पाच वाजता लोधवडे येथे ही घटना घडली. पोलिसांनी संशयित अर्जुनला ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

No comments